Jalgaon Ganja Seizure | नाकाबंदी मध्ये 20 लाखांचा गांजा जप्त

धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Jalgaon Ganja Seizure
नाकाबंदी मध्ये 20 लाखांचा गांजा जप्त(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जळगाव : धरणगाव पोलीसांनी नाकाबंदी मध्ये 40 किलो गांजा घेवुन जाणा-या वाहनावर कार्यवाही करुन कार सह एकुण 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला. या प्रकरणी आरोपीला घटनास्थळावरून प्रसार झाला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सुधीर चौधरी व किशोर भोई यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील कार धरणगाव शहरातील एच.डी.एफ. सी. बँकेच्या समोरुन वळवुन पुन्हा पारोळा नाका परिसरातुन पारोळा रोडाकडील रेल्वे बोगदयाकडेस वेगात घेवुन गेला होता. तेव्हा पोलीस अमंलदार यांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहन हे पारोळा रोडाजवळील कच्च्या रस्त्यावरील बाभळीच्या झाडाच्या आडोशाला उभे दिसले तो कार सोडुन पळुन गेलेला होता पोहेकाँ सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ सत्यवान बाबुराव पवार, पोकों किशोर देविदास भोई यांनी मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मेटालिक सिल्वर रंगाची कार क्रमांक. MH01 DP 0252 कार ची तपासणी केली असता त्यात एकुण 10,10,600/- रुपये किमंतीचा 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पालापाचोळा असलेला गांजा आढळुन आला.

Jalgaon Ganja Seizure
Jalgaon Fraud : उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून 55 लाखांची फसवणूक

धरणगाव पोलीस स्टेशनला येवुन स्विफ्ट डिझायर कार क्रमांक. MH01 DP 0252 वरील चालक याने विना परवाना बेकायदेशीर रित्या सुका हिरवट रंगाचा 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा गांजा विक्री करण्यासाठी कार क्रमांक MH01 DP 0252 मध्ये बाळगुन तिची वाहतुक करतांना मिळुन आला म्हणुन पोकों किशोर देविदास भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कार चालक यांच्या विरुध्द धरणगाव पोलीस स्टेशनला NDPS ACT प्रमाणे गुन्हा नोद करण्यात येवुन कारसह एकुण 20,10,600/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news