जळगाव : नाशिक शिक्षक मतदार संघासाठी जळगाव जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर 13122 मतदार आपले मतदान करणार आहे. यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
शिक्षक मतदार संघासाठी जळगाव जिल्ह्यातील तहसील ऑफिस व इतर शाळांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. 13122 मतदार त्या त्या ठिकाणी जाऊन मतदान करतील.
यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 22 तहसील ऑफिस चोपडा 974 यावल तहसील 794 नवीन तहसील कार्यालय रावेर 732 तहसील कार्यालय मुक्ताईनगर 442 तहसील कार्यालय बोदवड 165 डीएस हायस्कूल भुसावळ 619 डीएस हायस्कूल भुसावळ 636 आर आर विद्यालय जळगाव 669 आर आर विद्यालय जळगाव 665 भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यालय जळगाव 962 तहसील कार्यालय धरणगाव 337 तहसील कार्यालय अमळनेर 698 राजशेठी मीटिंग हॉल तहसील कार्यालय जवळ अंमळनेर 559 तहसील ऑफिस पारोडा 670 तहसील ऑफिस एरंडोल 376 तहसील ऑफिस भडगाव 617 नानासाहेब वाय एन चव्हाण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज चाळीसगाव 699 नानासाहेब वाय एन चव्हाण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज चाळीसगाव, 749 तहसील ऑफिस पाचोरा, 865 झेडपी प्रायमरी स्कूल वाकी रोड जामनेर 864 असे या वीस मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
पुरुष 9673 तर महिला 3449 असे एकूण 13122 मतदार शिक्षक व शिक्षिका आपल्या मतदानाचा हक्क उद्या दि. 26 रोजी बजावणार आहे.