जळगाव : जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

वनमहोत्सव : सुरत रेल्वे गेट पासून निमखेडी मार्गे झाडे जगविण्याचा ध्यास
वृक्षारोपण
जैन इरिगेशनच्या सहकार्यातून वृक्षारोपणाप्रसंगी ॲड. सुनील खैरनार, डॉ. नितीन विसपुते, प्रविण पाटील, राजेंद्र राणे, रोहिणी सोनार, संगिता नाईक, मनिषा पाटील, उदय पाटील, मनोज देशमुख, प्रकाश पाटील, सी. एस. नाईक, लुंकड, वसंत पाटील, मदन लाठी, जे. एम. तापडिया, संजय ठाकरे आदी. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदू अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवरामनगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज, बहुळा, कदम, चिंच, जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात मनपा आरोग्य अधिकारी तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, मनिषा उदय पाटील यांच्या हस्ते रोप लागवड करुन झाली. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोहिणी सोनार, राजेंद्र राणे, वन विभागाच्या अश्विनी ठाकरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, संगिता नाईक, ॲड. सुनील खैरनार, जे. एम. तापडिया, अनिल जोशी, संजय ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, डॉ. नितीन विसपुते, हरित सेनेचे प्रविण पाटील, शिवमनगरचे अनिल पाटील व सहकारी, वसंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस वसुंधरेसाठी देऊया, झाडे लावून, झाडे जगवूया’ या संकल्पातून जैन इरिगेशनने हा उपक्रमासाठी विशेष सहकार्य उपलब्ध करुन दिले. श्रीनाथजी हाउसिंग सोसायटी मधील हरिष लुंकड, गिरीष लुंकड, विजय तिवारी, मनोज देशमुख, स्वाती देशमुख यांच्यासह लहान मुलांनी व जैन इरिगेशनचे आर. एस. पाटील, संजय साळी, देवेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला. मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली.

‘जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वृक्षारोपण मोहिमेला विशेष मार्गदर्शन केले असून त्यांच्याच सहकार्यातून आज रविवार (दि.७ जुलै) रोजी वृक्षारोपण केले जात आहे. विद्यार्थ्यांसह आपण प्रत्येकाने उरलेले पाणी फेकून न देता एखाद्या झाडाला ते पाणी टाकले तर ती सहज वाढतील. आणि वाढलेले तापमान नियंत्रणात आणण्यास मदत करतील आणि आपले भविष्य सुकर करतील. प्रत्येकाने फक्त सेल्फी काढण्यापुरते झाडे लावू नये ती जगवली पाहिजे.

’सी. एस. नाईक, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी, जळगाव.

दरम्यान ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमास मनपास्तरावर पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. झाडांची निगा राखली जावी यासाठी १०० ट्रि गार्ड स्वत: लावणार असल्याचे जाहिर केले. राजेंद्र राणे, वसंत पाटील, प्रविण पाटील, डॉ. नितीन विसपूते, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन झाडे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news