

Youth arrested for cheating in court clerk examination using AI technology
धुळे : पुढारी वृत्तसेवा
उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई पदासाठी मोबाईलमध्ये प्रश्न पत्रिकेचा फोटो अपलोड करून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार करणाऱ्या परीक्षार्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, धुळ्यात उच्च न्यायालयाचे लिपीक व शिपाई पदासाठी लेखी परीक्षा होती. या परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करणार नाहीत, अशा सुचना देण्यात आली होती. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची डिजीटल वस्तू, मोबाइल परीक्षा हालमध्ये घेवुन जाणार नाहीत, तसेच कोणत्याही पध्दतीची कॉफी करणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या.
या परीक्षेकरीता जिजामाता कन्या हायस्कुल येथे केंद्र देण्यात आले होते. तसेच निरीक्षक म्हणून विजय श्रीपाद भट यांची ड्युटी नेमण्यात आली हाती. नेमलेल्या ड्युटीप्रमाणे ते कर्तव्यावर हजर असताना अन्य निरीक्षक सी.डी. पाटील यांनी त्यांच्याकडे येवुन खोली क्रमांक 21 मध्ये हजर परीक्षार्थींची माहिती घेऊन येतो, असे सांगितले.
या खोलीमध्ये एक शिपाई या पदाचा उमेदवार मोबाईलवर बघुन पेपर सोडविताना दिसला. त्यावेळी भट यांनी ही बाब परीक्षा परिवेक्षक अशोक पाटील यांच्या लक्षात आणुन दिली. या उमेदवाराजवळ जावून बघितले असता त्याचा मोबाल ताब्यात घेतला.
या परीक्षार्थीची चौकशी केली असता त्याचे नाव नाजिब अली तबस्सुम सैय्यद (रा. चाळीसगाव रोड) यांचा आसन क्रमांक पी-081695 असून हा परीक्षार्थी परिक्षा केंद्रात गैरप्रकार करताना मिळून आला. त्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो मोबाईलवर अपलोड केला. त्याचप्रमाणे ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर शोधून कॉपी करताना आढळून आला.
सदर उमेदवार परीक्षेमध्ये गैरप्रकार करतांना मिळुन आल्याने त्याचा ओपो कंपनीचा मोबाइल व ऊत्तरपत्रिका जप्त केली. सदरची घटना केंद्र संचालक न्या. श्रीमती वाय.जी. देखमुख यांच्या निर्देशनात आणुन दिली. त्यानुसार न्या .श्रीमती वाय. जी. देखमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार शिपाई या पदाचा उमेदवार नाजिब अली तबस्सुम सैय्यद यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.