शिंदखेडा तालुक्यातील आरवे गावात घरफोडीचा प्रयत्न; ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले

यानंतर संतप्त जमावाने चोरट्याला चांगला चोप दिला
शिंदखेडा तालुक्यातील आरवे गावात घरफोडीचा प्रयत्न; ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले
Published on
Updated on

सोनगीर : शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावात भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहात पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती गावात येऊन कपाटाचा लॉकर व दुरुस्ती करून देतो असा बहाना करत फिरत होता. यावेळी आरवे गावातील एका महिलेने आपल्या घरातील कपाटाचे लॉक खराब असल्याच सांगितलं. संबंधित व्यक्तीने ते तात्काळ दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देत घरात प्रवेश मिळवला. लॉकर दुरुस्ती करत असताना त्या व्यक्तीने महिलेकडून पिण्याच्या पाण्याची मागणी केली. महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक गृहात गेल्याचा फायदा घेत त्या अनोळखी व्यक्तीने लॉकर मधील काही सोन्याचे दागिने कपड्यांमध्ये लपवून ठेवले.

महिला परत आल्यावर तिला संशय आल्याने तिने लॉकर उघडण्यास सांगितले, मात्र संबंधित व्यक्तीने लॉकर उघडत नसल्याच सांगितल्याने महिलेचा संशय अधिकच बळावला. तिने तात्काळ आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थानी त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडून लॉकर मधील सोन्याचे दागिने सापडले. यानंतर संतप्त जमावाने चोरट्याला चांगला चोप दिला.

चौकशी दरम्यान त्या व्यक्तीने आपले नाव परबतसिंग दिलीपसिंग शीककलिगर राहणार नंदुरबार असल्याचे सांगितले. तसच यापूर्वीही त्याच्यावर चोरीचे आरोप असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सध्या परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे तसेच अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना पूर्ण खात्री करूनच प्रवेशद्यावा असे आवाहन करण्यात आले. घटनेबाबत पुढील तपास शिंदखेडा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news