Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 | काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना? कसा घ्याल योजनेला लाभ?

ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ? कसा घ्याल लाभ?file photo
Published on
Updated on

धुळे : राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी, तालुका पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिष पवार यांनी केले आहे. (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)

अशी आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहायक साधने, उपरकरणे खरेदीकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्याचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार इतकी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधारसंलग्न खात्यात लाभ प्रदान करण्यात येतो.

या योजनेतंर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधणे, उपकरणे यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी खरेदी करता येतील. यासाठी शासनामार्फत 100 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानतंर्गत नागरिकांची सर्व्हेक्षण व स्क्रिनींग घरोघरी जाऊन करण्यात येते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्व्हेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येते.

योजनेसाठी पात्रतेचे निकष (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)

31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण केलली असावीत. आधारकार्ड असणे आवश्यक आहे अथवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक राहील. आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळख दस्ताऐवज असतील ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे. जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय, सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेतंर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेतंर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा आवश्यक राहील. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिंक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे. लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

आधारकार्ड, मतदानकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक छायाकिंत प्रत, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वंय घोषणापत्र, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव 16 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज संबंधित तालुक्यांच्या गट विकास अधिकारी, तालुका पंचायत समिती, तसेच जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, येथे संपर्क साधावा. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news