विद्यार्थ्यांनी यशासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे : जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन
dhule
चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन Pudhari
Published on
Updated on

धुळे | परिश्रम व जिद्दीच्या जोरावर चांगले यश संपादन करावयाचे असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, येथे संपन्न झाले. यावेळी धिवरे बोलत होते. या कार्यक्रमास बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲड. अनिता भांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, क्रीडा अधिकारी स्वप्नील बोढे, परीविक्षा अधिकारी दिनेश लांडगे, बालसंगोपन संस्थाचालक सुनिल वाघ, शरद पाटील, हिरालाल भोसले, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, साधारणत: अनेक विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलता न येणे, आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे शल्य असणे, गणित विषय अवघड वाटणे असे विविध प्रकारचे न्यूनगंड असतात. त्यामुळे विद्यार्थी त्रासून जातात. मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगता कामा नये. परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आपण आपले आवडीचे क्षेत्र निवडून आपले आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध कसे करता येईल. याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. प्रत्येकाने आपल्या मनातून न्यूनगंड काढून टाकून शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. प्रत्येक मुलांच्या आवडी निवडी वेगवेगळया असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी निवडी ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करुन यश संपादन करावे. सध्या बाल गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला, कोणत्याही अप्रवृत्तीला, चुकीच्या मित्राला, संगतीला, विचाराला आपल्या मनात आणि जीवनात स्थान न देण्याचे आवाहनही धिवरे यांनी यावेळी केले.

यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित श्री. संस्कार मुलींचे बालगृहाचे संस्थापक सुनिल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव यांनी केले. तर सुत्रसंचलन पुनम बेडसे यांनी तर सहायक लेखाधिकारी मनिषा पिंपळे यांनी आभार मानले.

प्रारंभी धिवरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते कबड्डी, 100 मीटर धावणे या क्रीडा स्पर्धांचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षणगृह, बालगृहातील विद्यार्थीं, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news