Dhule News | आर.सी.पटेल विद्यालयाचे विद्यार्थी सुवर्ण पदकाने सन्मानित

आर.सी.पटेल च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरीय निबंध स्पर्धेत सुवर्ण पदक
gold medal
आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरीय पर्यावरण जनजागृतीपर आधारित निबंध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले (छाया : यशवंत हरणे)

धुळे : शिरपूर तालुक्यातील गरताड येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरीय पर्यावरण जनजागृतीपर आधारित निबंध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला.

'टाटा इंडिया बिल्डिंग' या संस्थेने राष्ट्रीय स्तरीय पर्यावरण जनजागृतीपर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या देशपातळीवरील स्पर्धेत शाळेतील 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी लहान गटात कृतिका श्रीराम खैरनार सुवर्ण पदक, भाग्यश्री मोहन अहिरे रजत पदक, गुंजन राजेंद्र पाटील कांस्य पदक अशी बक्षिसे प्राप्त केली आहेत. तसेच मोठ्या गटात रोहित सुरेश पाटील सुवर्ण पदक, हितेश महेंद्र पाटील रजत पदक व दिवेश राजेंद्र पाटील कांस्य पदक अशी बक्षीसे प्राप्त केली आहेत. यशवंताना सुवर्ण मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या हस्ते बक्षीस देऊन गुण गौरव करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल, मुख्याध्यापक के.बी.चौधरी, सर्व शिक्षक, पालक आदींनी अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news