

धुळे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे 87.10 टक्के लागल्याने तो पिछाडीवर राहिला आहे. नाशिक जिल्ह्याने 95.38 टक्के निकालासह विभागात बाजी मारली आहे. या निकालावरून मुलींची शैक्षणिक प्रगती आणि सातत्य यंदाही मुलींची आघाडी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
नाशिक विभागात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा धुळे जिल्ह्यातून 28,405 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 28,036 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, आणि त्यात 24,420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळेचा निकाल 87.10 टक्के लागला.
नाशिक : 95.38 टक्के
धुळे : 87.10 टक्के
जळगाव : 93.87 टक्के
नंदुरबार : 88.19 टक्के
यंदा परीक्षा केंद्रांवर प्रशासन आणि शासनाने केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. मागील वर्षी (मार्च 2023) विभागात 70 कॉपीचे प्रकार आढळले होते, तर यंदा (मार्च 2024) अशा एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका यंदा सर्वाधिक 92.05 टक्के निकालासह आघाडीवर आहे. इतर तालुक्यांचा निकाल असा...
धुळे महानगर : 79.80 टक्के
धुळे तालुका : 70.21टक्के
साक्री : 66.23 टक्के
शिंदखेडा : 66.17 टक्के
यंदाही मुलींचा निकाल मुलांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण धुळे जिल्ह्यातील निकाल –
विद्यार्थी : 68.48 टक्के
विद्यार्थिनी : 72.54 टक्के
तालुकानिहाय मुलामुलींचे निकाल असा..
साक्री : विद्यार्थी – 60.41टक्के, विद्यार्थिनी – 72.61 टक्के
शिरपूर : विद्यार्थी – 79.86 टक्के, विद्यार्थिनी – 94.95 टक्के
शिंदखेडा : विद्यार्थी – 63.30 टक्के, विद्यार्थिनी – 70.16 टक्के
धुळे महानगर : विद्यार्थी – 76.28 टक्के, विद्यार्थिनी – 83.84 टक्के
धुळे तालुका : विद्यार्थी – 71.73 टक्के, विद्यार्थिनी – 78.79 टक्के