Dhule News : शिरपूर मर्चंट बँकेची फसवणूक : तत्कालीन चेअरमन ,संचालकांसह कर्जदारांच्या विरोधात गुन्हा दाखल

असुरक्षित कर्ज वितरण आणि वसुलीतील हलगर्जीपणा यातुन बँकेची फसवणूक झाल्याची फिर्याद
Fraud Case |
Dhule News : शिरपूर मर्चंट बँकेची फसवणूक : तत्कालीन चेअरमन ,संचालकांसह कर्जदारांच्या विरोधात गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Shirpur Merchant Bank fraud

धुळे : दि. शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या असुरक्षित कर्ज वितरण आणि वसुलीतील हलगर्जीपणा यातुन बँकेची फसवणूक झाल्याची फिर्याद लेखापरीक्षक अजय राठी यांनी दिली आहे. संबंधित आरोपींनी बँकेची 13 कोटी 75 लाख 86 हजार 253 रुपयांची फसवणुक केलेली आहे. त्यानुसार बँकेचे चेअरमन संचालक आणि कर्जदार अशा 49 जणांच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लेखा परीक्षक यांनी काही नावे वगळण्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

दि शिरपूर मर्चटस को ऑप बँकेच्या आर्थिक वर्ष सन 2023-24 मधील 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील वैधानिक लेखा परिक्षण करण्यासाठी दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी बँकेच्या प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील ठरावानुसार व या ठरावास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कडील पत्रानुसार वैधानिक लेखा परिक्षणाचे नियुक्ती आदेश प्राप्त झाले. त्यानंतर दि शिरपूर मर्चटस को ऑप बँकेच्या लेखा परिक्षणाचे कामकाज सुरु करण्यात आले. त्यादरम्यान बँकेतर्फे वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांची माहिती घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याची तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार बँकेचे तत्कालीन संचालक तसेच कर्जदार असे ४९ जण आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह

Fraud Case |
Pune Heavy Rainfall : पावसाचे थैमान! पुणे-सोलापूर महामार्गावर कार गेली वाहून, स्वामी चिंचोली येथे वाहतूक ठप्प (Video)

या तक्रारीमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.आय.वी.पी. प्रकारचे कर्ज संचालकाच्या जवळच्या नातेवाईक व संबंधितांना विनातारणी वाटप करण्यात आलेले आहे. कर्जदारांकडुन कुठलेही कागदपत्रे न घेता कर्जाच्या रकमा रोख स्वरुपात देण्यात आलेल्या आहेत. संस्थेने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रयत्न केलेले नाही. या प्रकरणात संस्थेचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

यापैकी एक कर्जप्रकरण हर्षद जयराज जैन हे बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्ना जयराज जैन यांचे सख्खे बंधु आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे संचालकांनी त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देणे प्रतिबंधित असताना देखील प्रसन्ना जयराज जैन यांनी बैंकेचे मॅनेजर संजय केशवराव कुलकर्णी यांच्यासोबत संगनमत करुन हर्षल जयराज जैन यांना विनातारणी कर्ज दिलेले आहे.

'या' कर्जदारांनी कर्ज व्यवसायासाठी न वापरता दुसरीकडे वळविल्याची शक्यता

कर्जदार इतेश हसमुखलाल जैन, एकनाथ बालकिसन भंडारी, केतनकुमार जयराज जैन, श्रीराम अशोक विठोबा,जैन शांतीलाल दगडुलाल, तेली खुदाबक्ष शेख चांद, अग्रवाल दिलीपकुमार राधेश्याम, भागवत गिरीजा गिरीष , भागवत गिरीष सिध्दनाथ , अग्रवाल गोविंदलाल मदनलाल , धाकड प्रमोद गजानन, जैन ईतेश हसमुखलाल , अग्रवाल भगवान बाबुलाल , शेख खतिव अजिज ,जैन जतीन किरण , शाह संगिता अविनाश , शाह सचिन विनेंद्र , शेख कामील अहमद शेख नजीर , अहिरे सुरेश तुळशीराम , जैन अमोल कांतीलाल , चौधरी भुषण अरुण , पटेल चंचालाल हिरालाल ,कमलानी रमेश हुरालाल, देशमुख प्रविण चंद्रसिंग , जैन हर्षद जयराज, अग्रवाल रामेश्वर घासिलाल , गिरासे जितेंद्र शांताराम , जयस्वाल रितेश सुरेश , माळी नितीन लक्ष्मण , दलाल भगवान रामकृष्ण , गुजराती सुरेशलाल छगनलाल ,जया किरणचंद जैन , अमरदीप रमेश सिसोदिया, प्रकाश महारु चौधरी , रविंद्र महारु चौधरी, जतीन किरणचंद जैन ,दिलीप एकनाथ धाकड, मंगलसिंग कुंदनसिंग जाधव , राजेंद्र नंदलाल अरुजा , सौरव राजेंद्र भंडारी , जयपाल विजयसिंग गिरासे , निखील अशोक अग्रवाल , निमराज शामदास चौधरी , सिध्दार्थ प्रकाश थोरात (सर्व रा शिरपूर जि धुळे) या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु या कर्जाची मुदतीत परतफेड न केल्यामुळे व हे कर्ज त्यांनी ज्या व्यवसायासाठी घेतलेले आहे, त्या व्यवसायासाठी न वापरता दुसरीकडे वळविलेले असल्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.

ही कर्ज प्रकरणे कर्ज घेताना विनातारणी घेतली होती. मध्यंतरीच्या काळात बँकेचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी पुष्कळशी कर्जप्रकरणे तारणी झालेली आहेत. अथवा कर्जाची परतफेड झालेली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाच्या मास्टरर्स सर्क्युलर ऑन विलफुल डिफॉल्टर नुसार थकबाकीदार कर्जदारांनी बँकेचे चेअरमन प्रसन्ना जयराज जैन, बैंक मॅनेजर संजय केशवराव कुलकणी, महेश पंडितलाल गुजराथी, दिलीप वाळकृष्ण कापडी (सर्व रा शिरपूर) तसेच तत्कालीन कर्ज अधिकारी, अकौंटंट, वसुली अधिकारी यांच्यासोबत संगनमत करुन विनातारणी आय बी पी कर्ज, हायपोथिकेशन कर्ज, कोल्ड स्टोरेज लोन असे कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमाप्रमाणे परतफेड न करता बैंक सभासद व ठेवीदार यांचा विश्वासघात करुन बैंक सभासद व ठेवीदारांची एकुण 13 कोटी 75 लाख 86 हजार 253 रुपयांची फसवणुक केलेली आहे. त्यानुसार आता या सर्व 49 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news