इंदवे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रुग्णांसाठी संजीवनी

इंदवे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रुग्णांसाठी संजीवनी
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे इंदवे येथील आरोग्य वर्धनी केंद्र उत्तम प्रकारे कार्यरत असुन गावातील रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात आहेत.

दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 7 उपकेंद्र असून इंदवे येथील उपआरोग्य केंद्रांमध्ये दररोज सरासरी 20 ते 25 रुग्णांवर औषधोपचार केला जातो तर काही उपकेंद्रांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. दुसाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणीसाठी दररोज 60 ते 65 रुग्ण येतात पूर्वीच्या तुलनेत आरोग्य केंद्रातील प्राथमिक सुविधेत वाढ झाली असून,रिक्त जागा ही पुरेशा प्रमाणात भरल्या गेल्या आहेत.दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.लीना जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे दुसाने अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये सोयीसुविधा वाढल्या आहेत. तसेच रेफर सेंटरची ओळख त्यांनी खोडून काढली असून या केंद्रामध्ये महिन्याला 25 ते 30 महिलांवर प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपचार केले जात आहेत.तसेच या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये कर्मचारीवर्ग,औषधांची उपलब्धता दिसून येते.असे असले तरी गावातील उपकेंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी नागरिक टाळाटाळ करताना दिसून येतात अनेकजण खाजगी दवाखान्यांकडे धाव घेतांना‌ दिसून येत आहे.डॉ.जाधव यांनी वर्धनी उपकेंद्र इंदवे,हाट्टी खुर्द आदीं गावांना भेट दिली असता यावेळी इंदवे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉक्टर जाधव म्हणाले की,दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वर्धनी केंद्रांमध्ये चांगल्या दर्जाची सेवा दिली जात आहे.आरोग्य सेवक,आरोग्य सेविका यांची संख्या पुरेशी आहे.गरोदर महिलांनी,नागरिकांनी शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी अमित पाटील,भगवान बोरसे,गोकुळ बोरसे,गफ्फार शहा,सामुहीक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर मलिक,आरोग्य सहाय्यक एस.के.वसावे,आरोग्य सेवक दीपक पाटोळे,आरोग्य सेवीका अलका पाटील,आशा कर्मचारी वंदना भदाणे,ज्योती वाघ आधी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये होणारे 13 प्रकारचे उपचार

प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा,बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन,गर्भ निरोधक व आवश्यक आरोग्य सेवा, सामान्य आजारांसाठी बाह्य रुग्ण सेवा,संसर्गजन्य रोग्य नियोजन व तपासणी, असंसर्गजन्य रोग्य नियोजन व तपासणी,मानसिक आरोग्य नियोजन तपासणी सेवा,दंत व मुखरोग्य आरोग्य सेवा, नाक,कान,घसा व डोळ्यांचे सामान्य आजार संबंधी वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार,प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news