

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून 15 कि.मी अंतरावर असणारे मैंदाणे गावाजवळ ट्रकने पुणे नवापूर बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक, ट्रक चालकासी सहचालक आणि 10 जण जखमी झाले आहेत.
मैंदाणे गावाजवळ सोमवार (दि.7) सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची पुणे नवापूर बस (एमएच20बीएल-3442) ला ट्रकने (टीएन 34ऐवाय-1788)ने समोरुन धडक दिली. या अपघात बस चालकासह 8 प्रवासी जखमी झाले. बस चालक फत्तेसिंग जयवंत दळवी (41, रा.नवापूर,नानासाहेब भिका पाटील दहिवेल), सोमनाथ काळु चौधरी (दरीपाडा), दिलीप दत्तात्रेय चव्हाण, निलीमा दिलीप चव्हाण, दगडु मुरलीधर शिंपी, शोभा दगडु शिपी, सुनिता प्रविण निकुम सर्व (रा.नवापूर) हे जखमी झाले. ट्रकचालक पी मुरली (तामिळनाडु), सहचालक गंभीर जखमी असून त्यांचे नाव समजू शकलेले नाही. अपघातात बस आणि ट्रकचा समोरील भाग चक्काचुर झाला आहे. अपघात होताच 108 रुग्णवाहिकेवरील चालक अजय पवार घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मैदाणे, बोदगाव, चिंचपाडा येथील नागरीकांच्या मदतीने दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वसावे व परिचर यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरु केले आहेत. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु आहे.