पिंपळनेर : वसंतराव नाईक जयंती निमित्ताने साक्रीत कृषी दिन साजरा

साक्री तालुक्यात कृषिदिन साजरा, शेतकऱ्यांना मिळाले मार्गदर्शन
Pimpalner Sakri
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेचे पूजन करतांना पंचायत समिती साक्री सभापती शांताराम कुवर. समवेत आदी मान्यवर पदाधिकारी. (छाया : अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर,जि.धुळे : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती व डॉ पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी सप्ताह निमित्ताने कृषीदिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती, साक्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवार (दि.१) रोजी तालुका स्तरीय पंचायत समिती साक्री सभापती शांताराम कुवर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेचे पूजन करत कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर साक्री तालुक्यातील शासनाचा कृषी विषयक पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला.

पुरस्कार्थी असे...

संजय निंबाजी भामरे रा. काळगाव (कृषिभुषण शेतकरी), विजय रामदास भामरे रा.कालदर(शेतीनिष्ठ शेतकरी) ,भिमराव बोरसे रा.आमळी (सेंद्रीय शेती कृषिभुषण), दुल्लभ जाधव रा.खुडाणे (सेंद्रीय शेती कृषिभुषण पुरस्कार) व संजय आनंदा घरटे रा. सामोडे (शेतकरी मार्गदर्शक) आदींचा यामध्ये समावेश होता.

कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना काळगाव येथील संजय निंबाजी भामरे यांनी त्यांच्या शेतात राबविलेले विविध कृषीविषयक उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध कृषिविषयक योजना यावर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगिर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबाबतची माहीती दिली. यावेळी पंचायत समिती, साक्रीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

Pimpalner Sakri
कृषि संजीवनी सप्ताह निमित्तोन वृक्षारोपण करण्यात आले(छाया : अंबादास बेनुस्कर)

बळसाणे गणाचे पंचायत समिती सदस्य महावीर जैन कार्यक्रमास उपस्थित होते. पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश नेतनराव यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती, साक्री कृषी अधिकारी शिरीष कोकणी (विघयो), विस्तार अधिकारी कृषी डी. एन. तमखाने, वाय. डी. सोनवणे, सी. झेड. शिरसाठ तसेच तांत्रिक अधिकारी (कृषी) संदिप सुर्यवंशी, शाहरुख पिंजारी, शाम पावरा, संदीपकुमार गायकवाड यांनी परिश्रम घेतले. विजय काकुळते यांनी सुत्रसंचालकन केले व आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news