

पिंपळनेर, जि.धुळे : 'आर.आर.आबा पाटील सुंदर गाव' पुरस्कार योजनेत साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालिकेने सहभाग नोंदविला आहे. संबंधित कमेटीने याबाबत नुकतीच निजामपूर गावाची पहाणी केली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीना त्यांच्या क्षमतेनुसार शासनाच्या विविध योजना अंमलबजावणी करून स्वच्छता, घाण व्यवस्थापन दायित्व, अपारंपारिक ऊर्जेसाठी पर्यावरण व पारदर्शकता, तंत्रताज्ञाचा वापर अशा बाबींवर गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा व तालुकास्तरीय 'आर.आर.आबा पाटील सुंदर गाव' पुरस्कार योजनेत निजामपूर ग्रामपालिकेने सहभाग नोंदविला आहे. या पार्श्वभूमीवर आर.आर.आबा पाटील सुंदर गाव कमेटीचे अध्यक्ष गणेश चौधरी, गटविकास अधिकारी भरत घरटे, सहलेखाधिकारी एन. आर.पाटील विस्तार अधिकारी, रविकांत वाघ आरोग्य विभाग, एच.डी.महंत ग्रामपंचायत विभाग हर्षदीप भामरे, ग्रामीण पाणीपुरवठा जगदीश खाडे व प्रवीण मोरे पं.स.साक्री कमेटीने निजामपूर ग्रामपालिकेला भेट देऊन गावाची व दफ्तराची पाहणी केली.
कमिटीने स्वच्छतेबाबत अमरधाम, जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांची पाहणी केली. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. कमेटीचे सरपंच शीतल शाह, उपसरपंच श्याम पवार, ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे, सदस्य ताहीर बेग मिझा, विजय राणे, सखाराम विसपुते, परेश पाटील, मुश्ताक पठाण, पं.स.चे माजी सदस्य वासुदेव वाणी, दिलीप पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थितीत होते.