

पिंपळनेर,जि.धुळे : एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात एम.आय.डी.सी आणी राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने राज्यातील बस स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्याकरण करण्यात येईल अशी घोषणा तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याच वेळेस गावित यांनी साक्री, पिंपळनेर आणि धुळे येथील बस स्थानकाच्या वाहनतळाचे कॉंक्रीटीकरण करुन मिळावे म्हणून मागणी केली होती.
या मागणीस दुजोरा मिळाल्याने मागणी मान्य झाली असून धुळे, साक्री आणि पिंपळनेर बसस्थानकांचे वाहनतळ कॉंक्रीटीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात साक्री बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले आणि फेब्रुवारी महिन्यात शुक्रवार (दि. 28) रोजी पिंपळनेर बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन गावित यांनी केले.
माझ्या वाहन चालक-वाहक बंधुना मी विनंती करते की, त्यांनी प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी आणी आपल्या काही अडी-अडचणी समस्या असल्यास माझ्याकडे सांगाव्यात. त्या सोडविण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन. आपल्या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या आगाराला नविन बसेस मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. असे यांनी साक्री बस स्थानक वाहनतळाचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी सांगितले. तसेच चालक आणी वाहक यांनी प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. पिंपळनेर आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, सुलभ शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार आहोत.
मंजुळा गावित, आमदार, साक्री, धुळे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित होते. बस स्थानकात महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालयाची सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा व हायमास्ट लाईट उपलब्ध करावयाची आहे ती देखील लवकरच पूर्ण करु असे डॉ.तुळशिराम गावित यांनी सांगितले.
कार्यक्रमास ए.पी,आय, किरण बर्गे, उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर एखंडे, विधानसभा संघटक संभाजी अहिरराव, आगार प्रमुख महाले, नगरसेवक बाळा शिंदे, व्यापारी आघाडी प्रमुख शाम कोठावदे, सागर गावित, इंद्रजित पाटील, जाकीर शेख, महिला आघाडी सुरेखा सुर्यवंशी, भाजपा महिला आघाडी कविता क्षिरसागर, रोशन मन्सुरी, जगदीश ओझरकर, दिलीप बधाण, डॉ पंकज चोरडीया, जितेंद्र बिरारीस, बबलु चौधरी, विक्की वाघ, चंदुदादा यांचेसह परिसरातील नागरीक प्रवासी बांधव व पिंपळनेर आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.