

पिंपळनेर,जि.धुळे : न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे विद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब आर.एन.शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणबरोबरच सर्वांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सामुहीक गायले. बल्हाणे गावातील ज्येष्ठ नागरिक अरुण अहिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एच.के.चौरे, ज्येष्ठ शिक्षक विजय दहिते, एस.बी.राणे, शिक्षक एस.जे.नगरकर व के.ए.मराठे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डी.बी.अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. एम.व्ही.अहिरराव यांनी महाराष्ट्र दिनाचे व जागतिक कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल मान्यवरांच्या हस्ते जाहिर करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.