पिंपळनेर : अवैध विदेशी मद्याची तस्करी; चालकावर गुन्हा दाखल

अवैध विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश,चालकावर गुन्हा
पिंपळनेर
परराज्यातून महाराष्ट्र राज्यात एका चारचाकीतून होणारी विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे(छाया:अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर,जि.धुळे : परराज्यातून महाराष्ट्र राज्यात एका चारचाकीतून होणारी विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पाच लाख रूपये किमतीच्या वाहनासह 1 लाख 14 हजार 500 रूपये किंमतीचे विदेशी मद्य मिळून आले आहे. एकूण 6 लाख 14 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना जी. जे.05/ आर. सी.9930 क्रमांकाच्या वाहनामधून गुजरात राज्यातील दिव व दमण येथून महाराष्ट्र हद्दीतील साक्री तालुक्यातील शेलबारीमार्गे विदेश मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बर्गे यांनी पिंपळनेर पोलिसांसह एलसीबी शाखेच्या पथकास कारवाईचे आदेश दिले. पिंपळनेर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने बुधवार (दि.2) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शेलबारी जवळील हॉटेल सरकार ढाबा येथे संशयितांचे वाहन येतांना दिसले. वाहनचालकास थांबवून विचारणा केलीस असता चालकाने उडवाउडीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलीस पथकाने वाहनाची झाडाझडती घेतली. या तपासणीत वाहनात 1 लाख 14 हजार 500 रूपये किमतीचे विदेशी मद्यसाठा मिळून आला. या चौकशीत चालकाकडे वाहतुकीचा कुठलाही कायदेशिर परवाना मिळून आलेला नाही.

याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चालक मांगिलाल लाखाराम विश्नोई (44 ,रा.कुराडोकी ढाणी लालजीकी डुंगरी, ता.चितलवाणा, जि. सांचोर,राजस्थान) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एडीपीओ संजय बांबळे, धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र माळी, रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, प्रविण धनगर, संदीप पावरा, कपिल पावरा, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news