Pimpalner | साक्रीत विजेचा लपंडाव; उष्णतेमुळे नागरिकांना घामाच्या धारा

रहिवाशांचे ऐन उन्हाळ्यात अतोनात हाल
पिंपळनेर, जि.धुळे
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे साक्री शहरात दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतोयPudhari News Network
Published on
Updated on

पिंपळनेर, जि.धुळे : गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे साक्री शहरात दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांचे ऐन उन्हाळ्यात अतोनात हाल होत आहेत. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे विजेचा लपंडाव पाहता 'कर्मचारी मस्त, जनता मात्र त्रस्त' असे म्हणायची वेळ आता नागरिकांवर आली आहे

निसर्गाच्या बदलत्या ऋतु चक्रामुळे सध्या सूर्य आग ओकत असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विविध दुरुस्तीच्या कामाच्या नावाने वीज कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. हे प्रमाण सध्या वाढल्याने विविध शासकीय कामकाजासाठी तसेच ऑनलाईनची कामे करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो आहे. इतकेच नव्हे तर रूग्णांनाही यामुळे त्रास होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे घरगुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. ऐन उन्हाळ्यात वीज गायब होत असल्याने घामाच्या धारा सोसाव्या लागत आहे.

तालुक्यात विजेची मुबलक उपलब्धता असताना देखील सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज वितरण विभागातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रकारचा वचक राहिला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. वास्तविक शहरी भागातील वीज ग्राहक असल्याने ते वीज वितरण कंपनीचे नियमित ग्राहक आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांचे होणारे हाल हे केवळ वीज वितरण कंपनीच्या गलथानपणा तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजात लवकरात लवकर सुधारणा करून जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

महेंद्र देसले ,तालुकाध्यक्ष, भाजपा ओबीसी स्थिति

सतत दुपारच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती ग्राहक तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विविध कामकाजाच्या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय. वीजवितरण कंपनीने आपल्या कामकाजात लवकरात लवकर सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

ॲड. पूनम काकुस्ते, शिंदे, नगरसेविका, साक्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news