

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या कोऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसची विधीवत पुजा करून साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पाच बसेस पैकी 3 बसेस संभाजी नगर तर 2 बसेस जळगावकडे धावणार आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी आ.मंजुळाताई गावित यांच्या सोबत जि.प.सदस्य गोकुळ परदेशी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अक्षय सोनवणे, भाडणे सरपंच अजय सोनवणे, नगरसेवक बाळा सोनवणे, जितु खैरनार, मंगलदास सुर्यवंशी, विदा सोनवणे, जितु नांद्रे, पंकज भामरे, डॉ.पंकज चोरडिया, कमलाकर माहिते, बबलू चौधरी, गुड्डु सुर्यवंशी, अनिल देवरे, सचिन गाढे, साक्री आगार प्रमुख महाले, वाहतुक निरीक्षक पी. के. अहिरे, दिलीप भामरे आदि उपस्थित होते.
आमदार गावीत यावेळी म्हणाल्या की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून साक्री आणि पिंपळनेर बस स्थानकाचे कॉंक्रिटिकरण करुन घेतले आहे. त्याचवेळी त्यांच्याकडे साक्री आगारासाठी किमान 25 बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 5 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. या बसेस पैकी 3 संभाजीनगर (औरंगाबाद) तर 2 बसेस जळगाव कडे धावणार आहेत.पिंपळनेर, जि.धुळे
या बसेसचा प्रवासी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी केले आहे. आणखी नविन बसेस उपलब्ध करुन देण्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले आहे. धुळे जिल्ह्यासाठी आलेल्या 5 बसेस साक्री आगारास उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय गिते यांचे आभार मानले.