पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल गावाकडून पिंपळनेरकडे एका पीकअप वाहनातून कत्तलीच्या इराद्याने होमारी गोवंशाची वाहतूक रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले. या कारवाईत पिकअप वाहनासह गोवंश एकूण 3 लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना एम. एच. 04 डी. डी. 0448 क्रमांकाच्या पीकअप वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पथकास कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने सामोडा गावाजवळील गावाजवळील दहिवेल चौफुलीवर शुक्रवार (दि.4) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान संशयित पीकअप वाहन पोलीस पथकास येतांना दिसले. पोलीसांनी वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची पहाणी करण्यात आली. वाहन तपासणीमध्ये आठ गायी अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या कारवाईत तीन लाख रूपये किमतीच्या वाहनासह 70 हजार किमतीचे गोवंश मिळून आहे. याप्रमाणे वाहनासह एकूण 3 लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. वाहनचालक अमिर खान यासह अन्वर खान पठाण (33, रा. रहेमताबाद, ता. मालेगाव, जि. नाशिक) याचे विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, संजय बांबळे, वामन चौधरी, विश्वेश हजारे, प्रकाश मालचे, भरत बागुल, पंकज माळी, पंकज वाघ, रविंद्र सुर्यवंशी या पोलीस पथकाने ही कामगिरी पार पाडली.