Pimpalner Election 2025 : पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी संघटनात्मक, इच्छुक उमेदवारांची बैठक

पिंपळनेर शहराची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा
पिंपळनेर (जि. धुळे)
बैठकप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे(छाया : अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर (जि. धुळे) : पिंपळनेर येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल, ज्येष्ठ नेते आ. अमरिशभाई पटेल आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक आणि इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस (संघटन) भाऊसाहेब देसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बैठकीत पिंपळनेर शहराची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणी, तसेच नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय उमेदवार निवडीबाबत चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष खलाणे यांनी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली.

मार्गदर्शन करताना खलाणे यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे, प्रभागनिहाय नियोजनावर भर दिला
मार्गदर्शन करताना खलाणे यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे, प्रभागनिहाय नियोजनावर भर दिला

मार्गदर्शन करताना खलाणे यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे, प्रभागनिहाय नियोजनावर भर देण्याचे आणि संघटनात्मक बळकटी साधण्याचे आवाहन केले. तसेच पक्षाकडून होणाऱ्या सर्वेक्षणांच्या आधारेच उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस राज्य परिषद सदस्य मोहन सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत (भैय्या) पाटील, प्रदीप कोठावदे, प्रा. सविताताई पगारे, सरचिटणीस शैलेंद्र आजगे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष इंजी. के.टी. सुर्यवंशी, पिंपळनेर मंडलाध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, पिंपळनेर (ग्रा.) मंडलाध्यक्ष विक्की कोकणी, जिल्हा कार्यसमिती सदस्य योगेश नेरकर, सुधामती गांगुर्डे तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news