

पिंपळनेर,जि.धुळे : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार शासन अधिसूचना 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली असून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद गठीत करण्यात आली आहे.
नव्याने गठीत करण्यात आलेल्या नगर परिषदेवर शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रशासकांनी अंदाधुंद व मनमानी कारभार सुरू केला आहे.
घंटागाडी समस्या,नळातून दूषित पाणी,पांझरा नदीचा अनधिकृत प्रवाह बदलला जात आहे,नदीवर अनधिकृत अतिक्रमण होत आहे.मुताऱ्या व प्रसाधनाची दुरावस्था पिंपळनेर शहरात प्रचंड प्रमाणात आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले चहाच्या दुकानांवर चहासाठी कागदी व प्लास्टिक कपांचा सर्रास वापर होतो आहे. गल्ली बोळात,रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पथदिवे बंद आहेत,सविस्तर निवेदन राज्याचे मुख्य सचिव यांना पाठविण्यात आले आहे. नगरपरिषद कार्यालयात तपास केल्यावर प्रशासक मिटींगला गेले आहेत एवढेच उत्तर मिळतं. रोज मीटिंग असणे शक्य आहे का? जर खरोखरच मीटिंग असतील तर शहराचा कारभार कोणी बघायचा, शिवाय मिटींगला गेल्यावर हालचाल रजिस्टर वर नोंद का केली जात नाही. तसेच कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी आवश्यक आहे. अभ्यागतांना कामकाजाबाबत अभिप्राय लिहिण्यासाठी फार्म नाही, शासनाला व जनतेला भुलथापा देऊन गावातील समस्या सोडविण्यात व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या कामचुकार प्रशासकाची त्वरित हकालपट्टी करावी, अन्यथा मानवाधिकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आपण कार्यवाही केल्याबाबत आम्हास अवगत करण्यात यावे ही विनंती, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण थोरात कार्याध्यक्ष व सर्व संघटनेने केली आहे.