पिंपळनेर,जि.धुळे
गेल ॲण्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या कॉपर केबल चोरीचा गुन्हासंदर्भात एकास अटक करण्यात निजामपूर पोलीसांना यश आले आहे. (छाया:अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर : कॉपर केबल चोरीचा गुन्हा उघड; निजामपुर पोलिसांची कारवाई

एकास अटक; कॉपर केबल चोरीप्रकरणी साथीदारांचा शोध सुरु
Published on

पिंपळनेर,जि.धुळे: साक्री तालुक्यातील सालटेक शिवारात असलेल्या गेल ॲण्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर.09 मधील कॉपर केबल चोरीचा गुन्हा निजामपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले.

साक्री तालुक्यातील सालटेक गावाच्या शिवारात असलेल्या गेल ॲण्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर.09 मधील कॉपर केबल चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवार (दि.24) पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 302,(2),3(5)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी तपास चक्र फिरवून संशयित आरोपी देविदास बंडु थोरात उर्फ देवऱ्या (रा.रायपुर ता.साक्री) यास पकडले. त्याच्याकडुन 26 हजार रुपये किमतीची चोरलेली कॉपर केबल वायर जप्त करण्यात आली असून अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक एस.आर. बांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, मधुकर सोमासे, कर्मचारी यशवंत भामरे, प्रभाकर गवळे, रुपसिंग वळवी, प्रशांत ठाकूर, नारायण माळचे, रतन मोरे, नागेश्वर सोनवणे, प्रदीप आखाडे, खंडेराव पवार, परमेश्वर चव्हाण, श्रीराम पदमर, अशोक तावडे, सागर थाटसिंगारे, कृष्णा भिल, पृथ्वीराज शिंदे, गौतम अहिरे यांनी ही कारवाई पार पाडली.

पिंपळनेर,जि.धुळे
धुळे : कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news