पिंपळनेर : वेतन दिरंगाई विरूद्ध एसटी कामगारांचे साक्रीत आंदोलन

कृती समितीच्या वतीने साक्री आगार युनिटच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने
कृती समितीच्या वतीने साक्री आगार युनिटच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करताना महाराष्ट्र एसटी कामगार.
कृती समितीच्या वतीने साक्री आगार युनिटच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करताना महाराष्ट्र एसटी कामगार.(छाया : अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर,जि.धुळे : वेतन दिरंगाई विरोधात महाराष्ट्र एस.टी.कामगार कृती समितीच्या वतीने साक्री आगारातील कामगारांनी निदर्शने करीत तीव्र आंदोलन पुकारले आहे.

एसटी प्रशासनाने देय तारखेस वेतन अदा करण्याचे न्यायालयात मान्य करूनही जुन 2024 व पेड इन जुलै 2024 चे वेतन 10 तारीख उलटून गेली तरी वेतन झालेले नाही. प्रशासनाकडून जी फाईल मंत्रालयात वित्त विभागाकडे पाठवण्यात आली होती ती बजेट प्रोव्हीजन नसल्याने नाकारण्यात आली आहे. आता नव्याने प्रोव्हीजन झाली असली तरी सर्व सोपस्कार पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची मंजूरी घेऊन वेतन देण्यास विलंब लागणार आहे. "कामगारांनी महीनाभर कष्ट केलंय, काम केलंय... मात्र आम्हाला हक्काचे वेतन वेळेवर मिळत नाही ते त्वरीत अदा करावे" यास्तव महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने साक्री आगार युनिटच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली आहेत.

याप्रसंगी सर्व कृती समिती,संघटनेचे पदाधिकारी कुंदन ठाकरे, संदिप पवार, साहेबराव सोनवणे, महेश काळे, प्रशांत परदेशी, नाना चव्हाण, शशीकांत देवरे तथा सदस्य व तसेच सर्व कामगार मोठ्या संख्येने निदर्शनात सामील झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news