

पिंपळनेर,जि.धुळे : पुणे येथे पुस्तक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षात रत्नसुंदर सुरीश्वर महाराज व रत्नत्रेय ट्रस्ट आणि पुणे बुक फेस्टिवलमध्ये अनेक लेखकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन ठेवण्यात आले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदणीत लेखक जैनाचार्य श्री रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे.
रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांचे अनेक शीर्षक असलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनामध्ये पुरस्कार मिळाला आहे. 481 व्या पुस्तकाचे प्रदर्शन करण्यात आले. आचार्य महाराज यांनी गेल्या 58 वर्षांपासून मानवतेची सेवा, वैचारिक, कौटुंबिक, संस्कृती, धार्मिक, आध्यात्मिक, जीवदया, प्रेम अशा अनेक विषयांवर अनेक पुस्तकांतून मानवाला सुसंस्कृतपणे जीवन कसे जगावे, असा संदेश दिला आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक पुस्तकांचे प्रती प्रकाशित होऊन वितरित झाले आहेत. जैनाचार्य परमपूज्य श्री रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी जैन आगम ग्रंथानुसार वैचारिक व धार्मिक, आध्यात्मिक आपले विचार मांडले आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यानंतर श्री रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी जैन साधू दीक्षा घेतली.
लेखनासह जैनाचार्य परमपूज्य श्री रत्नसुंदर सुरीश्वर महाराज एक उत्कृष्ट वक्ते आहेत.त्यांनी आतापर्यंत पंधरा हजारांवर तासांचे सार्वजनिक प्रवचन केले आहे. जैन संताच्या विचारांवर दहा हजारांपेक्षा अधिक वेळ त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी पाच हजारांवर अधिक पुस्तकाचे वाचन केले आहे. महाराजांनी जैन शास्त्रासोबत अन्य धर्माचे ग्रंथांचेदेखील वाचन केले आहे.त्यांच्या 58 वषांच्या जीवनात काही संतांना दहा हजारांहून अधिक पत्रांचे उत्तर व्यक्तिगत स्वरूपाने उत्तर दिले आहे. त्यांच्या प्रवचनातून आणि लेखनाच्या माध्यमातून पारिवारिक एकता, सकारात्मकता ऊर्जा, क्रोध नियंत्रण, नैतिक जीवन आणि प्रेम यांच्या पूर्ण अनुभव होऊन गेला आहे. त्यांना भारत सरकारने यापूर्वी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी एकूण 481 पुस्तके लिहिल्यामुळे त्यांची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे.