पिंपळनेर येथे उद्या शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

महामेळावा यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Organizing a grand meeting of government services and schemes tomorrow at Pimpalner
जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे Pudhari
Published on
Updated on

पिंपळनेर, जि.धुळे | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने उद्या रविवार ( दि. 1 ) रोजी पिंपळनेर येथील साई कृष्णा रिसार्ट, येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

शासकीय सेवा व योजनांच्या मेळावानिमित्त पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे,उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, पिंपळनेरचे अपर तहसिलदार दत्ता शेजुळ आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा पालक न्यायमुर्ती,धुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार,1 डिसेंबर,2024 रोजी पिंपळनेर येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करावयाचे असल्याने प्रत्येक विभागाने लाभार्थ्याची निवड यादी अंतिम करावी. लाभार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी,अग्नीशमन,वाहन व्यवस्था,पार्किग व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाने साफसफाई करावी. कार्यकमाच्या ठिकाणी सफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना आणण्याची व्यवस्था करावी. माविम व उमेद यांच्या अधिनस्त बचत गटांच्या महिलांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.

महामेळाव्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत 50 स्टॉल्स लावण्यात येणार आहे. या ठिकाणी कृषी,जिल्हा परिषद,आरोग्य विभाग, महसुल विभाग,आदिवासी विकास विभाग,कौशल्य विकास,कामगार विभाग तसेच अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पत्रकाचे वाटप करावे.या मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता घेत हा मेळावा यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news