Dhule|'शिक्षक' निवडणूकसाठी अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
Nashik Teacher's Constituency Election 2024
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.(छाया : यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार (दि.२६) जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी मंगळवार (दि.२५) रोजी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Nashik Teacher's Constituency Election 2024
मतदानासाठी कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. (छाया : यशवंत हरणे)

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवार (दि.२६) जून रोजी मतदान होत असून याकरीता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ३, शिंदखेडा तालुक्यात २, साक्री तालुक्यात २ तर धुळे तालुक्यात ५ अशा एकूण १२ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात ८ हजार १५९ शिक्षक मतदार असून त्यात ६ हजार २०३ पुरुष तर १ हजार ९५६ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज मंगळवार (दि.२५) रोजी कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. मतमोजणी सोमवार, १ जुलै, २०२४ रोजी केंद्रीय वखार महामंडळ, वेअर हाऊस, अंबड, ता. जि. नाशिक येथे होणार आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ करिता सर्व शिक्षक मतदारांनी बुधवार (दि.२६) जून रोजी सकाळी ७.00 ते सायंकाळी ६.00 वाजेपर्यंत आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, तसेच मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १० अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावेत. या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news