पिंपळनेरला तेली समाजातर्फे गुणगौरव कार्यक्रम

तेली समाजाच्या गुणगौरव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार
Pimpalner
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(छाया : अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर,जि.धुळे : येथील तेली समाजातर्फे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शालेय साहित्याचे वाटप करुन यशोवंताचा सत्कार करण्यात आला.

तेली मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी शंकरराव चौधरी तर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तुकाराम चौधरी, आनंदा चौधरी, देविदास नेरकर, चंद्रकांत चौधरी, वनराज बागुल, श्रीराम चौधरी, अशोक नेरकर, वसंत नेरकर, सोमनाथ चौधरी, वसंत चौधरी हे होते. सुरुवातीला संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये तेली समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी केले. यावेळी श्रीराम दाऊत खाने यांनी मार्गदर्शन केले.

Pimpalner
पिंपळनेरमध्ये तेली समाजाचा गुणगौरव कार्यक्रम(छाया : अंबादास बेनुस्कर)

सत्कारार्थी असे...

कार्यक्रमास प्रसंगी वामन चौधरी, सुमनबाई पवार, रुपाली चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपळनेर शहर तेली समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी, उपाध्यक्ष सुभाष नेरकर, सचिव भरत बागुल, सहसचिव देविदास महाले, कार्याध्यक्ष देविदास नेरकर, खजिनदार सुरेश बागूल, संचालक मंडळ, युवक मंडळ सह विद्यार्थी, विद्यार्थिनी, समाज बंधु, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्तात्रय सुर्यवंशी, गणेश नेरकर यांनी सुत्रसंचलन केले. महेंद्र बागुल यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news