Dhule mayor news | धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी जोत्स्ना पाटील

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांना 50 मते मिळाली
Dhule mayor news | धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी जोत्स्ना पाटील
Published on
Updated on

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या मायादेवी महादेव परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची निवड झाली. या दोघांना प्रत्येकी 50 मते मिळाली. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने चमत्कार होणार असल्याचा दावा फोल ठरला आहे. तर शहर विकास आघाडी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच एम आय एम च्या उमेदवारांचा पराभव झाला.

धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक 50 जागा मिळाल्या असून एम आय एम ला दहा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ, आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना, मनसे तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खाते देखील उघडता आले नाही. या सर्व पक्षांचा दारुण पराभव झाला. संख्याबळाचे गणित पाहता धुळ्यात महापौर आणि उपमहापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल ,असे चित्र स्पष्ट होते. विरोधकांच्या वतीने निवडणुकीसाठी मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. मात्र एमआयएम, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकली नाही. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र गट नोंदणी करून शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या वतीने चमत्कार होईल, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे काहीशी उत्सुकता ताणली होती. मात्र प्रत्यक्ष महापौर निवडीत हा दावा फोल ठरला आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, सचिव मनोज वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर पदाच्या निवडीसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने मायादेवी परदेशी, एम आय एमच्या वतीने हसीना बानो साजिद अली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या शहर विकास आघाडीच्या वतीने सौ गीता तुषार नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांना 50, एमआयएमच्या हसीना बानो साजिद अली यांना दहा तर सौ गीता नवले यांना 13 मते मिळाली. एक सदस्य तटस्य राहिला.

उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्योत्स्ना प्रफुल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना 50 मते मिळवून त्या विजयी झाल्या. तर एम आय एम च्या वतीने आमिर असलम पठाण यांना दहा आणि शहर विकास आघाडीचे इरफान फजलू अन्सारी यांना 13 मते मिळाली. या निवडणुकीत देखील एक सदस्य तटस्य राहिला.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांना स्वतंत्र बैठकीत मतदान कसे करायचे, या संदर्भात माहिती दिली होती. तसेच व्हीप देखील बजावला होता. आज सकाळी मतदान प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात सर्व नगरसेवक एकत्र आले. येथून पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल,भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ पदाधिकारी महादेव परदेशी, डॉ. सुशील महाजन, गटनेत्या किरण कुलेवार, प्रतोद भगवान गवळी, भिकन वराडे, रणजित भोसले, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सोबत नगरसेवकांनी ढोल ताशाच्या गजरात चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महानगरपालिकेत प्रवेश केला. निवड जाहीर झाल्यानंतर डीजेच्या तालावर जल्लोष करीत रॅली काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news