Majhi Ladki Bahin Yojana 2024 : धुळे जिल्ह्यात 2 लाखांवर महिलांची नोंदणी

जिल्हा प्रशासनामार्फत माहिती
Majhi Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना File Photo

धुळे : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 438 महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या अर्जामध्ये 1 लाख 11 हजार 738 महिलांनी ऑफलाईन तर 88 हजार 700 महिलांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच 2 हजार 228 प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप सुरु आहे.

धुळे जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या नियंत्रणाखाली धुळे जिल्ह्यात 2 हजार 576 केंद्रावर महिलांचे अर्ज जमा करण्याचे काम सुरु आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत धुळे प्रकल्पात 20 हजार 572 ऑनलाईन तर 14 हजार 990 ऑफलाईन असे एकूण 35 हजार 562 अर्ज, शिंदखेडा ग्रामीण 12 हजार 121 ऑनलाईन तर 12 हजार 973 ऑफलाईन असे एकूण 25 हजार 94 अर्ज, शिरपूर ग्रामीण 13 हजार 503 ऑनलाईन तर 25 हजार 989 ऑफलाईन असे एकूण 39 हजार 492 अर्ज तसेच साक्री तालुक्यातील साक्री ग्रामीण क्षेत्रात 26 हजार 254 ऑनलाईन तसेच 29 हजार 374 ऑफलाईन असे एकूण 55 हजार 628 महिलांनी नोंदणी केली आहे. तसेच धुळे नागरी भागातील धुळे नागरी, शिरपूर, शिंदखेडा, साक्री व दोंडाईचा येथील 267 अंगणवाडी केंद्रातून 8 हजार 607 ऑनलाईन तसेच 13 हजार 88 ऑफलाईन असे एकूण 21 हजार 695 तर धुळे महानगरपालिका, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री व पिंपळनेर नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील 145 अंगणवाडी क्षेत्रात 7 हजार 643 ऑनलाईन तसेच 15 हजार 324 ऑफलाईन असे एकूण 22 हजार 967 महिला लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

जिल्हाभरात 2 हजार 576 केंद्र

या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यासाठी धुळे जिल्ह्यात 5 हजार 938 नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचबरोबर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होवू नये तसेच त्यांना कोणतीही अडचण येवू नये याकरीता जिल्हाभरात 2 हजार 576 केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी समितीमार्फत सुरू आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news