

धुळे | धुळे लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत तुटलेल्या पाईपलाईन आणि अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडे नळ हे जलजीवन मिशन मधील अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे असल्याची टीका आज खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी लोकसभेच्या अधिवेशनात केली आहे. जल जीवन मिशन योजनेचे तालुका निहाय ऑडीट करून या योजेनेची तालुका निहाय सखोल चौकशी करत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
लोकसभेचे अधिवेशन सुरू असून धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जलजीवन मिशन अंतर्गत धुळे लोकसभा क्षेत्रातील स्थिती अधिवेशनात मांडली या लोकसभा क्षेत्रामध्ये तुटलेल्या पाईपलाईन आणि अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडे नळ हे जलजीवन मिशन मधील अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे असल्याचे सांगत खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव लोकसभेत गरजल्या.“हर घर नल जल हर घर जल योजना” अर्थातच जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेची सुरुवात २०१९ मध्ये झाली असून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देणे होते. आणि पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचा विकास आणि विद्यमान स्त्रोताचे वाढ करून गावा गावात पाणीपुरवठा पायाभूत सुविधा निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. परंतु आजतागायत धुळे लोकसभा मतदार संघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा, सटाणा (बागलाण), मालेगाव ग्रामीण भागात जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. केंद्र शासनाने जनजीवन मिशन ने प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचण्याचा वचन दिलं होतं “हर घर नल जल हर घर जल योजना” हि दुर्दैवाने हे मिशन आज केवळ एक अपूर्ण स्वप्न बनले आहे. असे खडे बोल केंद्र सरकारला सुनावत ही बाब गंभीर आहे, असे निदर्शनास आणून दिले. धुळे लोकसभा मतदार संघातील या योजनेतील कामांचे संपूर्णपणे तालुका निहाय ऑडीट करून या योजेनेची तालुका निहाय सखोल चौकशी करावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. अशी जोरदार मागणी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी संसदीय अधिवेशनात केली आहे.
सरकार अभिमानाने दावा करते की, संपूर्ण देशामध्ये ७८ टक्के घरांना त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील ८७ टक्के घरांना आणि माझ्या धुळे लोकसभा मतदार संघातील ९९ टक्के घरांना जल जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु माझ्या मतदार संघातील लाखो लोकांसाठी ही वास्तव स्थिती खूप दूर आहे. सत्य हे आहे की, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तालुक्यांमध्ये केवळ ८ ते १२ दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी येते. आणि त्याचप्रमाणे बाजार व मालेगाव भागात आठवड्यातून फक्त दोन वेळा पाणी मिळते. तर झोडगे येथे १५ दिवसातून एक दिवस वेळ पाणी मिळते. तर मालेगाव ग्रामीण आणि सटाणा (बागलाण) आणि साल्हेर, मुल्हेर, डांग, वाघांबा सारख्या आदिवासी भागांमध्ये पाईप लाईन टाकली असून परंतु पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे नळांना पाणी नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, मला या ठिकाणी सांगावसं वाटतं की, तुटलेल्या पाईपलाईन आणि अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडे नळ हे अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे आहेत. आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत पाणी हा जीवनाच्या अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. याच अनुषंगाने धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी केंद्र सरकारला विनंती केली की, धुळे लोकसभा मतदार संघातील ५०टक्के अपूर्ण कामे पूर्ण करून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना, गरीब आदिवासी भागातील नागरिकांना मिळून देण्यासाठी धुळे लोकसभा मतदार संघातील या योजनेतील सर्व कामांची तालुका निहाय सखोल ऑडीट करून या योजेनेची तालुका निहाय सखोल चौकशी करावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. अशी जोरदार मागणी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी संसदीय अधिवेशनात केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोपपत्रातून समोर आलेत. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 तारखेला होणार आहे.