

पिंपळनेर,जि.धुळे : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,एक मुखाने बोला... बोला जय जय हनुमान, यासह विविध भक्तीगितांनी शहरातील नवापूर रस्त्यावरील शिवमल्ल हनुमान मंदिरांचा परिसर भक्तीमय झाला.
हनुमान जयंतीनिमित्त शिवमल्ल हनुमान मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळी चालीसा पठण, होम हवन व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. मंदिरामध्ये होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे बहुतांश मंदिरांना अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी रात्री भजन, कीर्तन गात सकाळी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शेखर शिरसाठ, पोलीस पाटील विशाल अंबेकर, मयूर कासार यांनी सपत्नीक महापूजा पूजा केली. आरती केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सकाळी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठभ मराठा समाज मंडळानी व मल्याच्या पाडा, भातोजी महाराज मंडळ यांनी भाडे साहित्याची मदत केली. शिव मल्ल हनुमान जन्मोउत्सव हा गावातील मयूर कासार, दिलीप माळी, पियुष कोठावदे, शिवराज गांगुर्डे, प्रीतम गांगुर्डे,अक्षय माडोळे, चेतन पगारे. पंकज वानखेडे, भैय्यासाहेब गांगुर्डे, अक्षय भावसार, आकाश खैरनार, आपू जैन, स्वामी खरोटे, भरत जगताप आदी भक्तांनी कार्यक्रमाची नियोजन केले. तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनी किरण बर्गे, उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी बंदोबस्त तैनात केला.