जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या ठिकाणी शासकीय निवासस्थाने बांधणार : पालकमंत्री जयकुमार रावल

दोंडाईचा पोलीस ठाण्यातील विविध कामांचा शुभारंभ
Dhule News |
दोंडाईचा येथील पोलीस ठाणे येथे ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय निवासस्थानाचे भुमीपूजन करण्यात आले.Pudhari Photo
Published on
Updated on

धुळे : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या आधुनिकीकरणासह अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. दोंडाईचा येथील पोलीस ठाणे येथे ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय निवासस्थाने भुमीपुजन, निवासस्थाने नुतणीकरणाचे उद्घाटन, पोलीस वाहन प्रदान सोहळा, व्हॉलीबॉल मैदान उ‌द्घाटन, आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री रावल पुढे म्हणाले की, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतुद केली आहेत. धुळे जिल्ह्याचे पोलीस दल चांगले काम करीत आहेत. त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पोलीसांनी नागरीकांच्या तक्रारींची त्वरीत दखल घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजेत. पोलीसांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण असतो. अशाही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते तत्पर असतात. अशावेळेस त्यांना स्थानिक ठिकाणीच चांगल्या सुविधांयुक्त शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणे आवश्यक आहेत. याकरीता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या ठिकाणी टप्प्याटप्याने निवासस्थाने बांधण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, शिरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मनिष वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी, शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे किशोरकुमार परदेशी, शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे निलेश मोरे, थाळनेर पोलीस ठाण्याचे शत्रुघ्न पाटील, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे केदार, मोटार परीवहन विभागाचे उप निरीक्षक रावसाहेब पाटील , प्रवीण महाजन, विजय मराठे, विक्रम पाटील, निखिल जाधव, हितेंद्र महाले, संजय मराठे, भरतरी ठाकूर, नरेंद्र कोळी, कृष्णा नगराळे, संजय तावडे, पंकज चौधरी, पंकज बोरसे, मनोज निकम, चंद्रकला सिसोदिया, पूजा खडसे, दोंडाईचा पोलिस अंतर्गत पोलीस पाटील, पोलिस कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्रकुमार बाविस्कर यांनी केले.

या कामांचे झाले भुमिपूजन, उद्घाटन

शासकीय १० निवासस्थाने भुमीपुजन व नूतनीकरण केलेले ८ निवासस्थानांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अनुशोध ॲप लोकार्पण करण्यात आले.

पोलीस विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नवीन खरेदी केलेल्या ७ पोलीस वाहनांचे लोकार्पण.

नविन व्हॉलीबॉल मैदान उद्घाटन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news