धुळ्यात प्लॉट विक्रीच्या नावाखाली दोन कोटी 65 लाखाची फसवणूक

पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Fraud in the name of plot sale
प्लॉट विक्रीच्या नावाखाली फसवणूकPudhari File Photo

धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या महिंदळे शिवारातील शेत जमिनीवर असलेल्या प्लॉट विक्रीच्या नावाखाली दोन कोटी 65 लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पाच जणांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यातील सुभाष नगर परिसरात राहणारे संजय भागचंद जैन यांनी ही फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली आहे. नाशिक येथे राहणारे नरेंद्र दयाराम जाधव, अनिल दयाराम जाधव, तृप्ती सागर जाधव ,अविनाश सिद्धपुरे ,सागर काकडे यांनी ही फसवणूक केल्याचा आरोप संजय भागचंद जैन यांनी केला आहे. यातील नरेंद्र जाधव व अनिल जाधव यांनी पूर्वीपासून असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या नावाने महिंदळे शिवारातील शेत गट क्रमांक 113 या शेतजमिनीवर रहिवासी एन ए प्लॉटची मंजुरी घेतली. या शेतजमीनवर प्लॉट पाडून तिचे चांगले भावाने विक्री करण्याचे आमिष दाखवले. संजय जैन यांचा विश्वास संपादन करून नरेंद्र जाधव आणि अनिल जाधव यांनी शेतजमीन विकत घेण्यास सांगून तसा सौदा करण्यास भाग पाडले.

तक्रारदार संजय जैन यांच्याकडून या दोघांनी वेळोवेळी दोन कोटी 15 लाख रुपये व त्यानंतर 25 लाख रुपये डीडी द्वारे घेतले. त्याचप्रमाणे शेत जमिनीचा विकास रहिवास योग्य करण्यासाठी व शासनाच्या मंजुरी, प्लॉट एन ए करता इतर 25 लाख रुपये खर्च केला. अशा पद्धतीने दोन कोटी 65 लाखाचा खर्च आज पावतो व्यवहार म्हणून झाल्याचा दावा तक्रारदार यांनी केला आहे. या आरोपींनी प्लॉट परस्पर त्रयस्थ व्यक्तींना विक्री करण्याच्या उद्देशाने जाहिरात केली. आपण यासाठी व्यवहार केलेला असताना आपला विश्वासघात झाला असल्याचे तक्रार संजय जैन यांनी दिली आहे. या संदर्भात आरोपींनी शिवीगाळ करून जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news