Liquor Den Busted | शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त
Liquor Den Busted |
Liquor Den Busted | शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्तPudhari Photo
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी मधील कुसटया पाडा, जामणपाणी येथील एका झोपडीत बनावट दारू तयार करण्याचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बनावट दारू तयार करणाऱ्या ठिकाणाची बातमी मिळाली. कुसटया पाडा, जामणपाणी येथे मच्छिंद्र ऊर्फ सेहवाग ताराचंद पावरा हा गावाजवळील एका झोपडीत लोकांच्या आरोग्यास अपाय होईल अशी बनावट दारु चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे. अशी खात्री झाल्याने मिलिंद पवार यांनी पोलीस पथकाच्या मदतीने कुसटया पाडा, जामणपाणी येथे छापा कारवाई केली. यात बनावट देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.

या कारवाईत 2 लाख 03 हजार रुपये किंमतीचे बनावट दारूचे ५८ बॉक्स , वीस हजार रुपये किमतीचे स्पिरिट व बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिलींद पवार, संतोष पाटील, स्वप्निल बांगर, योगेश मोरे, संजय भोई, विजय ढिवरे, दिनकर पवार, धनराज गोपाळ, सुनिल पवार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news