Arjun Khotkar Case: अर्जुन खोतकरांचा पाय खोलात; बेहिशोबी रोकडप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश

Dhule Court: न्यायालयाचे आदेश : अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरांचा पाय खोलात
Arjun Khotkar
Arjun KhotkarPudhari
Published on
Updated on

Dhule Guest House Accounted Cash Case Arjun Khotkar PA

धुळे : येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या बेहिशोबी रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाचे शुक्रवारी (दि. 27) पोलिसांना दिले. यामुळे विधानसभा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा पाय अधिक खोलात गेल्याचे बाेलले जात आहे.

धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे 21 मे रोजी बेहिशोबी एक कोटी 84 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. विधानसभा अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना आणि समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायकाच्या नावाने बुक असलेल्या खोलीत ही रक्कम सापडल्याने माजी आमदार अनिल गोटे यांनी सदर रक्कम अंदाज समितीला देण्यासाठी जमा करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. तसेच याबाबत तक्रार देऊनही पोलिस व संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी धुळे पोलिसांनी आठवड्याभरानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीत धुळ्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी के. बी. चौगुले यांनी या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे समितीचे अध्यक्ष खोतकर यांच्यासह समिती सदस्य तसेच या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Arjun Khotkar
धुळे : धुळ्यातील बेहिशोबी रोकड प्रकरणात अदखलपात्र गुन्हा

वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास सहआरोपी

माजी आमदार गोटे यांनी या प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला असून, सदर बाबीचा पुरावा पुढे आल्यानंतर संबंधितांना सहआरोपी करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे.

Arjun Khotkar
Dhule Unaccounted Cash Found | विश्रामगृहातील बेहिशोबी रोकड प्रकरण : दुसरा आरोपी देखील माजी आमदारांचा स्वीय सहाय्यक

कागदपत्रे पोहोच करण्याचेही नमूद 

न्यायालयाने शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याबराेबरच यापूर्वी चौकशी करणाऱ्या यंत्रणेने शहर ठाण्याला सर्व कागदपत्रे पोहोच करण्याचेदेखील आदेशात नमूद केले आहे. या आदेशामुळे आता भारतीय न्यायसंहितेचे कलम 174 ,173, 210 ब व 175 या कलमांन्वये गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती माजी आ. गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news