Dhule Encroachment Issues | सुशी नाल्यासह शासकीय जागांवरील अतिक्रमणे तातडीने हटविणार : चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

सुशी नाल्यासह शासकीय जागांवरील अतिक्रमणांबाबत सुरू असलेल्या दिरंगाईचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत आमदार अनुप अग्रवाल यांनी शासनाचे लक्ष वेधले
Chandrashekhar Bawankule
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेPudhari Photo
Published on
Updated on

Dhule Sushi Nala Encroachment Issues

धुळे : शहरातील सुशी नाल्यासह शासकीय जागांवरील अतिक्रमणांबाबत सुरू असलेल्या दिरंगाईचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत आमदार अनुप अग्रवाल यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत आमदार अग्रवाल यांनी सुशी नाल्यावरील अतिक्रमणे, गट क्रमांक ११३ मधील शासकीय जागेवरील अतिक्रमण, तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. गेल्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करून एक वर्षात कारवाईचे आश्वासन मिळाले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.

Chandrashekhar Bawankule
Dhule Crime : पळासनेर शिवारातून ३७ लाखांचा गांजा, अफू पावडर जप्त; तिघांना अटक

ते म्हणाले की, गट क्रमांक ११३ मधील अतिक्रमणप्रकरण न्यायालयात गेल्याने ‘जैसे थे’ स्थिती कायम आहे. प्रशासनाने सक्षम अधिकारी नेमण्यातही विलंब केल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. तसेच सुशी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, आमदारांनी मांडलेले सर्व मुद्दे योग्य असून शासन या प्रकरणी गांभीर्याने कारवाई करणार आहे. सुशी नाल्यालगतची अतिक्रमणे पूरस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असल्याने ती हटविणे आवश्यक आहे. २०११ पूर्वीची काही अतिक्रमणे असल्यास त्यांचे पुनर्वसन किंवा पर्यायी जागा देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Dhule Bribe Case : जिल्हा परिषदेच्या ‘त्या‘ लाचखोर अधीक्षकाला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

न्यायालयीन प्रक्रियेसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून, ‘जैसे थे’ आदेश मागे घेण्यासाठी विशेष सल्लागार नेमण्यात येणार आहेत. त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येईल.

तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विशेष बैठक घेऊन या सर्व प्रश्नांवर निर्णय घेतला जाईल. पावसाळ्यापूर्वी सुशी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शासकीय जागांवरील दर्ग्यासह सर्व अनधिकृत बांधकामांवरही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news