Dhule STP Plant | एसटीपी केंद्रातून रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती; शेतीसह बांधकामांसाठी मोफत पुरवठा

आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती; लवकरच प्रक्रिया केंद्राची क्षमता १७ एमएलडीपर्यंत वाढविणार
Sewage Treatment Plant Dhule
आमदार अग्रवाल यांनी कुंडाणे रोडवरील एसटीपी केंद्र क्रमांक एकची पाहणी केलीPudhari
Published on: 
Updated on: 

Sewage Treatment Plant Dhule

धुळे : धुळे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कुंडाणे रोडवरील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून (एसटीपी) दररोज सुमारे ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होत आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसह महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी तसेच शहरालगतच्या शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

आमदार अग्रवाल यांनी महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सागर पवार आणि सहाय्यक अभियंता निखिल कौठळकर यांच्यासह कुंडाणे रोडवरील एसटीपी केंद्र क्रमांक एकची पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रक्रिया व्यवस्थेची माहिती घेतली.

Sewage Treatment Plant Dhule
Dhule News |धुळ्यात सोशल मीडियावरील पोस्टमुळे वातावरण चिघळले! महापौरांच्या अपमान प्रकरणात गोरक्षक संजय शर्मा यांना अटक

अमृत अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राची क्षमता १७ एमएलडी आहे. सध्या येथे दररोज चार ते पाच एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. लवकरच प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवून दररोज १० ते १७ एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सध्या या पाण्याचा वापर कुंडाणे रोड परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी केला जात आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या काँक्रिटीकरणासह विविध विकासकामांमध्येही या पाण्याचा वापर केला जाणार आहे. तसेच शेतीसाठी पाण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांनाही ते मोफत देण्यात येईल. यासाठी महापालिकेच्या महासभेत ठराव करण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Sewage Treatment Plant Dhule
Dhule News : कर्तव्य बजावताना धुळ्याचे सुपुत्र जयेश माळी यांना वीरमरण, रामी गावावर शोककळा!

सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केल्याने नदी-नाल्यांमधील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, पाणीटंचाईच्या काळात पर्यायी जलस्रोत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.