Dhule Unseasonal Rain | साक्री तालुक्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आमदारांकडून पाहणी

साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Sakri taluka crop damage
Sakri taluka crop damagePudhari
Published on
Updated on

Sakri taluka crop damage

पिंपळनेर : साक्री तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंजुळाताई तुळशिराम गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बाधित भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.

बेहेड, कावठे, पेरेजपूर, कासारे, मालपूर, नांदवण, भाडणे, अष्टाणे आणि विजापूर या गावांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Sakri taluka crop damage
Dhule news | तालुक्यात अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान; अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश

अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका, टोमॅटो आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः गारपीटीमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गव्हाचे आणि हरभऱ्याचे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे तातडीने व वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गावित यांनी प्रशासनाला दिले. तसेच शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news