Dhule Fire | बोदगाव येथे गोठ्याला भीषण आग; शेतकऱ्याचे ८५ हजारांचे नुकसान

शेतीची अवजारे, सागवान लाकूड आणि जनावरांचा चारा जळून खाक; तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी
Sakri Cattle Shed Fire
Sakri Cattle Shed FirePudhari
Published on: 
Updated on: 

Sakri Cattle Shed Fire

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बोदगाव येथे गुरुवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत शेतीची अवजारे, सागवान लाकूड आणि जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेतकरी रामदास लाला पवार यांचे अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रामदास पवार यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात पहाटे अचानक आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपळनेर नगरपरिषदेचा अग्निशमन बंबही दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, बोदगावचे महसूल अधिकारी के. एच. वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच पंचनामा केला.

Sakri Cattle Shed Fire
Dhule Crime | बहावलपुरी समाजाच्या अध्यक्षावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आठ महिन्यांनंतर गुन्हा दाखल; नगरसेवकासह दहा जण आरोपी

तातडीच्या मदतीची मागणी

आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या आगीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. जनावरांचा चारा जळाल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी रामदास पवार यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस सदस्या संगीता गणेश गावित यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.