

धुळे पुढारी वृत्तसेवाः राज्यातील काही भागात एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा (बर्ड फ्ल्यू) पक्षांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. धुळे जिल्ह्यात कोठेही पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418/ 1962 वर त्वरीत दूरध्वनी करुन कळवावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील यांनी केले आहे.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत तसेच बर्ड फ्ल्यु आजाराबाबत नागरिकांनी अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पाटील यांनी केले आहे.