

धुळे : लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश चाळीसगाव रोड पोलिसांनी केला असून, यासंदर्भात एजंटसह तीन महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आपण अशाच प्रकारे अनेक लग्नाळू तरुणांना गंडविल्याचे या टोळीने कबूल केले आहे. या टोळीचा एजंट सचिन मरगडे, काजल, काजल हिची बहीण असल्याचा दावा करणारी नेहा व उज्जैन येथून आलेली मुलगी पूनम अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अलंकार सोसायटीत राहणारा तुषार रमेश खैरनार याला या टोळीने दीड लाखाला गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. एजंट आणि तीन महिलांनी मिळून यापूर्वी अनेकांना फसवल्याची माहितीही पोलिसांनी दिली.