Dhule news: इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा लाचखोर सहायक संचालक जाळ्यात

या तक्रारीची धुळे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली आहे
Bribery case
Bribery casepudhari photo
Published on
Updated on

धुळे : कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दोन टक्क्यांच्या दराने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे.

Bribery case
Bribery Case: अटक टाळण्यासाठी ४ लाखांची मागणी; पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदार आहेत. त्यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या 'वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने'अंतर्गत धुळे तालुक्यातील मौजे खंडलाय बुद्रुक येथील हाटकर वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे १० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांनी ३ टक्क्यांनुसार ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

Bribery case
Jalgaon Bribery Case: बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची धुळे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने १० लाखांचे बिल काढून देण्यासाठी अडीच टक्क्यांनुसार २५ हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीअंती दोन टक्क्यांनुसार २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

Bribery case
Pune Women Police Bribery Cases: पुण्यातील 'लेडी सिंघम'च लाचखोरीच्या जाळ्यात; तीन महिन्यांत तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांना अटक

त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचण्याचे नियोजन केले. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, प्रवीण पाटील आणि मकरंद पाटील यांच्या पथकाने धुळे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news