Dhule News | कांदा व्यापाऱ्याला 58 लाखात गंडवणाऱ्याला मुंबईमधून अटक

3 महिन्यापासून होता पसार
Arrested
कांदा व्यापाऱ्याला 58 लाखात गंडवणाऱ्याला मुंबईमधून अटकFiIle Photo

धुळे पुढारी वृत्तसेवा : कांदा व्यापाऱ्याची 58 लाख रुपयांची फसवणूक करुन सुमारे 3 महिन्यापासून पसार असलेल्या मुख्य आरोपीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांच्या मदतीने धुळ्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Summary
  • कलीम सलीम शेख याचा भारतातून दुबई देशात कांदा निर्यातीचा व्यापार आहे.

  • त्याने 58 लाख 12 हजार 95 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

  • त्यानंतर तीन महिन्यापासून तो पसार होता.

या गुन्हयातील मुख्य आरोपी कलीम सलीम शेख याचा भारतातून दुबई देशात कांदा निर्यातीचा व्यापार आहे. इतर सह आरोपी हे सदर व्यवसायात पार्टनर आहे. आरोपी अनिल सोनवणे याने कांदा मालाचे विदेशात एक्सपोर्ट केल्यास दरमहा चांगली कमाई होईल, असे आमिष दाखवून तक्रारदार यांनी स्थानिक शेतकरी व व्यापारी यांचे कडून स्वखर्चाने कांदा विकत घेवून तो आरोपी कलीम शेख याने पाठविलेल्या कंटेनर मध्ये भरुन पाठवला. हा कांदा 55 लाख 24 हजार 624 रुपयांचा असुन कांदा माल वेळोवेळी दुबई येथे एक्सपोर्ट केला आहे. तसेच आरोपी कलीम शेख याने कंटेनर बुक करण्यासाठी पैसे नसल्याने आरोपी सलीम शेख, सरजील शेख, तस्लीम शेख, व रऊफ शेख यांचे रहाते घरी 5 लाख रुपये रोख देण्यास सांगितले. त्यावरुन फिर्यादीने ती रक्कम दिली. तसेच आरोपी अनिल सोनवणे याने मिरची व लसून एक्सपोर्ट करण्यासाठीचे व्यवसायासाठी 3 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितल्याने ती रक्कम फिर्यादी याने आरोपी अनिल सोनवणे यास रोख दिली. तसेच एक्सपोर्ट व्यवसायातील रक्कम परतची हमी आरोपी भिकन सोनवणे, जिजाबाई सोनवणे व अमोल बेडसे यांनी घेतली. परंतु दुबई येथे कांदा विक्री केल्यानंतरही मालाचे पेमेंट फिर्याद ने वेळोवेळी मागणी करुन सुध्दा अद्याप पावेतो कोणताच परतावा परत न करता संगनमताने कट रचून फिर्यादीचा विश्वासघात करुन एकूण 58 लाख 12 हजार 95 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

यांच्यावर गुन्हा दाखल

म्हणून या गुन्हयातील मुख्य आरोपी कलीम सलीम शेख, रा. पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस रेल्वे स्टेशन रोड येवला, सलीम फत्तूभाई शेख , सरजील उर्फ बाबा सलीम शेख , तस्लीम सलीम शेख अ.नं. 2 ते 4 रा. पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस, रेल्वे स्टेशन रोड येवला, पिंट्या उर्फ प्रमोद लक्ष्मण पोळ रा. नांदगाव रोड येवला, रऊफ अब्दुल रज्जाक शेख रा. शिंदे मळा, अवनकर गल्ली येवला, अनिल भिकन सोनवणे ऊर्फ सिंगम ऊर्फ गोल्डी रा. मालाड मुंबई ,भिकन सोनवणे , जिजाबाई भिकन सोनवणे रा. शिवप्रसाद कॉलनी धुळे , अमोल बेडसे रा. गंगापूर रोड नाशिक यांचे विरुध्द भादवि कलम 409, 406, 420, 120 [व], 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

यांनी केला गुन्ह्याचा तपास

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी सुरू केला.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपी कलीम सलीम शेख व इतर आरोपींचे शोधासाठी वेळोवेळी येवला, मनमाड, नाशिक, मुंबई परिसरात शोधपथक पाठवून माहिती काढण्यात येत होती. गुन्हयातील सुमारे 3 महिन्यापासून फरार असलेला गुन्हयातील मुख्य आरोपी कलीम सलीम शेख हा भारत देशातून दुबई येथे पळून जाण्याचे बेतात असतांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथील इमीग्रेशन अधिकारी यांचे मदतीने सहार पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेण्यात येवून अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news