Dhule News | कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात विशेष सूट देणाऱ्या ॲपचे लोकार्पण

भाजपाचे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांची माहिती
Dhule News
कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात विशेष सूट देणाऱ्या ॲपचे लोकार्पण

धुळे : माझे शहर माझी जबाबदारी या अभियान अंतर्गत आता धुळेकर जनतेला रुग्णालय, औषध विक्री दुकाने तसेच कृषी सेवा केंद्रांसह अन्य दुकानांवरून खरेदी केल्यास सूट देणारे ॲप तयार करण्यात आले आहे. सध्या धुळ्यात 100 व्यावसायिक याला जोडले गेले असून ही संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर आज या ॲपचे अनावरण करण्यात आले.

धुळ्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रसंगी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, ओबीसी आघाडीचे हिरामण गवळी, माजी नगरसेवक भिकन वराडे, रोहित चांदोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, धुळे शहरातील गरजू आणि गोरगरीब जनतेला वेगवेगळ्या ठिकाणी खरेदीसाठी जावे लागते. या दुकानांमध्ये त्यांना बिलात सूट मिळत नाही. पण आता धुळ्यात किमान शंभर व्यावसायिक एका ॲपच्या माध्यमातून जोडण्यात यश आले असून या दुकानांमध्ये गेल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर खरेदीवर सूट मिळणार आहे. विशेषता रुग्णालयाचे आणि औषध खरेदी देखील ही सूट मिळणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अशा पद्धतीचा ॲप तयार करण्यात आला असून हा विनामूल्य सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यासाठी एक विशेष लिंक पाठवली जाणार असून ही लिंक उघडल्यानंतर संबंधिताला आपली माहिती त्यात भरावी लागणार आहे. यानंतर हा ॲप डाऊनलोड होऊ शकेल. ॲप डाऊनलोड झालेल्या मोबाईल वरून संबंधित दवाखाना किंवा दुकानावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करता येणार आहे.

शंभर व्यावसायिक जोडण्यात यश

सध्या या शहरातील शंभर व्यावसायिक या ॲपच्या माध्यमातून जोडण्यात यश आले असले तरीही आणखी काही जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना देखील यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. विशेषता शेतकऱ्यांना शेती संबंधित लागणाऱ्या वस्तू विक्री करणारे व्यावसायिक देखील यात जोडले गेले आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत खते, बियाणे, तसेच अन्य वस्तू खरेदी करता येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे .त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवला जातो आहे. म्हणूनच जनतेची सेवा म्हणून आपण या ॲपचे आज लोकार्पण करीत असल्याचे देखील अग्रवाल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news