LPG अभावी पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानांमार्फत केरोसीन वितरणाचा निर्णय

Kerosene distribution Dhule | धुळे जिल्ह्यास 72 किलो लिटर केरोसिन मंजूर
LPG अभावी पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानांमार्फत केरोसीन वितरणाचा निर्णय
Published on
Updated on

धुळे : सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या टंचाईची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यास 3 हजार 744 किलो लिटर इतके नियतन मंजूर केले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यास 72 किलो लिटर केरोसिन मंजूर झाले असून नागरिकांना एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानांमार्फत केरोसीनचे वितरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना केरोसीन उपलब्ध करून देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रति कुटुंब शिधापत्रिकाधारकांना 3 लिटर केरोसीन अनुज्ञेय राहील. तसेच अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना वितरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसिन वितरणास पात्र राहतील. ज्या लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांनाही केरोसीन उपलब्धतेनुसार वितरणासाठी पात्र ठरविण्यात येणार असून त्यासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येईल. स्थलांतरित मजूर देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. यासाठी केंद्र व राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात यावे.

केरोसीन वितरण मार्च- एप्रिल 2026 मध्ये करावयाचे आहे. वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसांत संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक आहे. न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण केले जाणार नाही. लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवाना धारक यांनी शिधापत्रिकाधारक/ शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करावे. एखाद्या गावात केरोसीन साठा उपलब्ध नसल्यास जवळच्या गावातून वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. केरोसिन परवानाधारक, रास्तभाव दुकानदार यांनी केरोसिन साठा, वितरण यांच्या नोंदी भौतिक नोंदवहीमध्ये ठेवाव्यात. सदर नोंदवह्या अद्ययावत ठेवण्यात याव्यात.

केंद्र शासनाने राज्यास 3 हजार 744 किलो लिटर इतके नियतन मंजूर केले आहे. मार्च-एप्रिल 2026 चे कंपनीनिहाय केरोसीनचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यापैकी धुळे जिल्ह्यासाठी सुमारे 72 किलो लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी 6 टँकरलाही परवानगी देण्यात आली आहे. मंजूर नियतनानुसार तालुकानिहाय मागणीनुसार वितरण करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news