Dhule News | बेहेड-नांदवण प्रकल्पाच्या पाण्याचे शेतकऱ्यांनी केले जलपूजन

धरण पूर्ण क्षमतेने भरले, काटवन परिसरातील शेतकरी बांधवांत समाधान
Dhule News | Farmers performed Jalpuja with the water of Behed-Nandwan project
बेहेड-नांदवण प्रकल्पाच्या पाण्याचे शेतकऱ्यांनी केले जलपूजनpudhari photo
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणातून ओव्हरफ्लोने वाया जाणारे पाणी उजव्या कालव्यातून टाकून नांदवण बेहेड धरण (लघु प्रकल्प) पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरुन ओसंडून वाहु लागले आहे. म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांच्यासह विटाई ,बेहेड, नाडसे, दारखेल, निळगव्हाण, छाईल, कोकले, नांदवण, त्रिशुळपाडा या गावांसह कासारे गावातील शेतकरी बांधवांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले.

काटवान परिसरातील ग्रामस्थांसाठी जीवन वाहिनी असलेला प्रकल्प नांदवण धरण गेल्या अनेक वर्षानंतर पुर पाण्याने 100 टक्के भरल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. काटवान परिसरात नेहमीच उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, पाणी पुरवण्याच्या विहीरी कोरड्या होतात. ग्रामस्थांसह, गुरांना देखील पिण्याचे पाण्यासाठी भटकावे लागते. परंतु या वर्षी पाऊस चांगला झाल्याने साक्री तालुक्यातले लाटीपाडा, जामखेली, मालनगांव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पांझरा कान नदी दुधडी वाहु लागली म्हणून शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे, पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन दिल्याने त्वरीत उजव्या कालव्यातून सर्व गावांचे छोटे मोठे बंधारे गांव तलाव भरुन पुरपाण्याने बेहेड नांदवण धरणात पाणी टाकल्याने धरण 100 टक्के पुर्ण क्षमतेने भरले गेले.

सर्व गावांच्या शेतकरी बांधवांच्या हस्ते जलपुजन कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बेहेड नांदवण धरणाचे बांधावर काटेरी झाडे झुडूपे वाढल्याने शेतकरी बांधवांना येण्याजाण्यास अडचणी येतात. धरणाची खोलीकरण करण्यात यावे, धरणाकडे जाणारे दोन्ही रस्ते डांबरीकरण करण्यात यावे अशा विविध मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे करुन लवकरच पुर्ण करण्यात येईल असे शिवसेना सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांनी सांगितले.

यावेळी जलपुजन कार्यक्रमाला दिलीप काकुस्ते काँग्रेस, सुभाष देसले, गुलाबराव काकुस्ते, बेहेडचे ह.भ.पं.अशोक तोरवणे, विटाई उपसरपंच दिपक खैरनार, निवृत्ती हिरे, दारखेल सरपंच छोटु दादा भामरे, गुलाबराव भामरे, संदीप भामरे, बेहेड माजी सरपंच रमेश बच्छाव, वसंत तोरवणे, नाडसे येथील संजय भामेर, विशाल भामरे, संतोष भामरे, पंकज भामरे, कल्पेश भामरे, कोकले सरपंच सागर सावळे, कासारे गावाचे पोलीस पाटील दिपक काकुस्ते, निलेश खैरनार ,खंडु हिरे, प्रशांत देसले, बापु खैरनार, विलास देसले, पिंटु देसले, यशवंत बोरसे, भालचंद्र बोरसे, दिपक देसले, लक्ष्मण देसले, अनिल देसले, प्रभाकर तोरवणे, मधुकर तोरवणे, योगेश तोरवणे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काटवान शिवसेनेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काटवान शिवसेनेचे प्रविण तोरवणे, निलेश कुवर, विशाल भामरे आदींनी परिश्रम घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news