Dhule News | सकल हिंदू समाजाकडून विशालगड मुक्तीसाठी मोर्चा

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी
Dhule News
सकल हिंदू समाजाकडून विशालगड मुक्तीसाठी सरकारला निवेदनpudhari photo
Published on
Updated on

धुळे : विशाल गडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आज धुळ्यात सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली. मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Summary
  • धुळे येथील महाराणा प्रताप चौकापासून मोर्चा सुरु झाला.

  • जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.

  • गड किल्ल्यांवरील अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी करण्यात आली.

  • निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर भूमिका मांडली.

धुळे येथील महाराणा प्रताप चौकापासून वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधीने मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांच्यासमोर आपली भूमिका मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील स्वराज्याला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. ज्यामध्ये गडकोट किल्ल्यांचे एक वेगळे महत्त्व आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात गडकोट किल्ल्यांविषयी आस्था आहे. श्रद्धा आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तेथील सांस्कृतिक, सामाजिक इतिहासकालीन वैभव उद्धस्त करण्याचा प्रयत्न आहे. गडकोट किल्ल्यांवर अनधिकृत अतिक्रमणांचा देखील बिकट प्रश्न उभा राहिला आहे. सांस्कृतिक वैभव असलेल्या शासकीय संपत्तीवर अतिक्रमणधारकांनी जणू दरोडाच घातला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

समाजाला डिवचण्याचे काम

वेळोवेळी शासनाच्या व पुरातत्त्व विभागाच्या लक्षात आणून देऊन देखील जाणीवपूर्वक या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाचा विषय सर्व दूर चर्चेत आहे. विशाळगडावरील इतिहास व संस्कृतीला बाधित करणारे अतिक्रमणातून विशाळगडाच्या मुक्तीसाठी सर्व हिंदू समाजात ऊर्जा जोर धरत आहे. त्यामुळे हिंदू समाजाला डिवचण्याचे काम होत असल्याचे आंदोलक म्हणाले. शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांवरील इतिहासाला बाधित करणारे संस्कृतीचे विद्रूपीकरण करणारे व कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवतील असे सर्व अतिक्रमण काढून टाकावे. वारंवार हिंदू समाजाची बदनामी होते आहे. हिंदू समाज सहिष्णू आहे, परंतु हिंदू समाजाच्या सहनशीलतेचा अंत शासनाने न पाहता महाराष्ट्र राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांवरील इतिहासाला बाधित करणारे संस्कृतीचे विद्रूपीकरण करणारे व कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवतील असे सर्व अतिक्रमण काढून टाकावे. कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी विश्व हिंदू परिषद, विशाळगड मुक्तिसंग्राम समिती, हिंदू जागरण मंच, शिवसेना(शिंदे गट), शिवसेना(उबाठा गट), भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदुराष्ट्र सेना, श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, चंद्रशेखर आजाद नगर शिवजयंती उत्सव समिती, किल्ले लळीग संवर्धन समिती, यासह विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल, राजेश पाटील, भाऊ महाराज रुद्र, उमेश चौधरी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिलाल माळी, महेश मिस्त्री, डॉ. सुशील महाजन, डॉ.योगेश पाटील, भाजपाचे महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे, संदीप पाटोळे, कैलास मराठे, प्रभाताई परदेशी, रोहित विभांडीक, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news