Dhule news | शेतातील वीज लाईनच्या स्पार्किंगमुळे २ एकर गव्हाचे पीक जळून राख

नुकसान भरपाई देण्याची मागणी
Dhule news | शेतातील वीज लाईनच्या स्पार्किंगमुळे २ एकर गव्हाचे पीक जळून राख
Published on
Updated on

सोनगीर : शेतातून जाणाऱ्या मुख्य वीज लाईनमधून स्पार्किंगमुळे २ एकर गव्हाच्या पिकाला आग लागली. ही घटना शिरपूर तालुक्यातील बुडकी येथे घडली. यामध्ये शेतकरी हिम्मत पावरा यांच्या २ एकर शेतातील कोरडे गव्हाचे पीक जळून मोठे नुकसान झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास या घटनेमुळे हिरावून गेल्याने शेतकरी हिम्मत पावरा यांचे दुःख आवरेना असे झाले. MSEB च्या हलगर्जी पणामुळे ही घटना घडली असून याला जबाबदार असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत.

याबाबत संबंधित विभागाला तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अन्यथा समस्त शेतकरी संघटनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news