धुळे : राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर; जयंत पाटील यांना घेराव

खासदार अमोल कोल्हे यांचा आंदोलकां समवेत संवाद न करता काढता पाय
शिवस्वराज्य यात्रा
धुळे शहरात आलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा (छाया: यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी सोमवार (दि.23) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. आमदार पाटील यांनी निवेदन स्वीकारून कार्यकर्त्यांसमवेत संवाद न करता काढता पाय घेतला. विशेष म्हणजे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कार्यकर्त्यांना टाळून थेट ट्रॅक्टर रॅलीत सहभाग घेण्यात धन्यता मानली.

Summary

धुळ्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला मराठा आंदोलकांना तडाखा मिळाला तर नेते जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलकां समवेत संवाद न करता काढता पाय घेतला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा आज सोमवार (दि.23) धुळे शहरात आली. या निमित्ताने शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि संसद रत्न खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेण्याचे नियोजन केले. यासाठी जेलरोडवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनापासून पायी रॅली काढण्यात आली.

या रॅलीत सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, राजेंद्र काळे,संदीप पाटोळे, मनोज ढवळे,हेमंत भडक, किशोर वाघ, दीपक रौंदळ, विनोद कणसे,कैलास वाघारे, वीरेंद्र मोरे, पवन मराठे, बाळासाहेब ठोंबरे, तुषार पाटील,संतोष लकडे, गोविंद वाघ, भानुदास चौधरी, मराठे, तुळशीराम मस्के , तुकाराम बागुल, सर्जेराव इथापे, सचिन नागणे,सुनील वरपे, प्रकाश चव्हाण, पांडुरंग हरळ, अभिनय राजाराम पाटील, बबलू बागुल, बाळू गायकवाड, अनिल बगदे, मनोज ढवळे, महेंद्र रगडे, सुरेश पाटील, सुरेश पवार, रवींद्र नागणे, संजय बगदे, खंडेराव परभणे, अमर फरताडे, मुकुंद शिंदे वामन मोहिते, नरेंद्र हेमाडे, मनोहर जाधव, अशोक बाबर, विक्रम काळे, उल्हास पाटील, प्रफुल माने, खंडू पवार अरविंद भोसले, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या वाहनांचा ताफा तेथे पोहोचला. गाडीतून उतरताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेते जयंत पाटील यांना घेराव घातला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. धुळ्यात देखील त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूमिका स्पष्ट करावी अशी अशी आग्रही मागणी यावेळी मांडण्यात आली. नेते जयंत पाटील यांनी निवेदन स्विकारले मात्र कार्यकर्त्यांसमवेत कोणताही संवाद न करता ट्रॅक्टर रॅलीत सहभाग घैतला. खासदार अमोल कोल्हे यांनी तर मराठा समाजाच्या आंदोलकांसमोर जाणे टाळले. कार्यकर्त्यांचा जमाव टाळून ट्रॅक्टर रॅलीत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news